Hello

Sign in with Facebook

Active Groups

Twitter   
WHAT ARE YOU LOOKING FOR?
 
Home Life Goes On

Print PDF
Rahul
पुणेकरांनी व्यक्त केली चीड 'व्यंगचित्रांतून'
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 17, 2010 AT 12:14 AM (IST)

पुणे - बॉम्बस्फोटासारख्या घटनेनंतर डगमगून न जाता किंवा भीती न बाळगता मुंबईकरांप्रमाणेच पुणेकरही "लाइफ गॉज ऑन' या उक्तीप्रमाणे आपल्या दैनंदिन व्यवहाराला सामोरे गेले. मात्र, एकूणच या घटनेविषयीचा राग, संताप, राजकारण्यांविषयीची उद्वेग आणि व्यवस्थेविषयीची चीड त्यांनी आज अभिनव पद्धतीनं व्यक्त केली. शहरातील मुख्य मंडईजवळ दिवसभर बसून एका युवा चित्रकाराने जनतेच्या मनातील भावना रेखाटल्या.

पुणेरी पगडी ही खरंतर पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट. मात्र, याच पगडीला ठिकठिकाणी छेद जात असल्याचं रेखाटलेल्या चित्र पुणेकरांना हेलावून टाकले. यासारखीच बरीच चित्र प्रसाद लासूरकर या युवकांना आज दिवसभर रेखाटली.

पुण्यात झालेल्या घटनेचा कशा पद्धतीनं निषेध करता येईल, याचा प्रसाद विचार करत होता. त्यावेळी त्याला ही अभिनव संकल्पना सुचली. सुमारे पन्नासहून अधिक चित्रे त्याने रेखाटली आहेत. या प्रत्येक चित्रातून पुणेकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे त्यातून जाणवते.

"माय नेम इज खान' या चित्रपटाला अवास्तव सुरक्षा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर त्याचवेळी केंद्र सरकारने अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो, हे सांगूनही राज्य सरकारने त्यावर कडक पावले न उचलल्याचा निषेधही व्यक्त करण्यात आलाय. पुण्यात केवळ बॉम्बस्फोट झाला नव्हता, आता ते ही पूर्ण झाले आहे. तेव्हा देवा आता तूच वाचव, असे गणरायाला साकडे घालणारे चित्रही बोलके ठरते. महाराष्ट्र तरुण मंडळाने, या युवा चित्रकाराची संकल्पना उचलून धरली.

याबाबत प्रसाद म्हणाला, आजपर्यंत ज्या घटना घडल्या, त्याचा कुठेतरी परिणाम करत होत्या. त्याबाबतचा निषेध करण्याची इच्छा होती. आपण प्रत्यक्ष बंदूक घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकत नाही. त्यामुळे वेगळा विचार करत असतानाच ही कल्पना सुचली. शिवाय लोकांपर्यंत भावना पोचवण्याचे सर्वांत सोपे माध्यम म्हणून व्यंगचित्रांची निवड केली. मला जे काही बोलायचे होते, ते मी या चित्रातून बोललो.

 


Comments (0)Add Comment
Write comment
All fields marked with * are required

 
 
smaller | bigger
 

security image
Write the displayed characters *


busy